आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तरुण आणि तरुणींनाही गुडघेदुखीचा त्रास होऊ लागला आहे. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पुरुषांच्या तुलनेत महिलांना गुडघेदुखी च्या समस्या जास्त असतात. असे का होते? असा तुम्हाला आता नक्कीच प्रश्न पडला असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला आजच्या या Article मध्ये सांगणार आहोत.
महिलांना पुरुषांपेक्षा जास्त गुडघेदुखीची समस्या का उद्भवते?
लठ्ठपणा हे स्त्रियांच्या सांध्याच्या समस्यांचे मुख्य कारण आहे. साधारणपणे पुरुषांपेक्षा स्त्रियांना लठ्ठपणाचा त्रास जास्त असतो. जास्त वजनामुळे गुडघ्यांवर दबाव पडतो. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की गुडघे त्यांच्या वजनाच्या 5 पट दाब सहन करतात. महिला अधिक लठ्ठ असल्याने त्यांना गुडघेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते.
महिलांना पुरुषांपेक्षा गुडघेदुखीची समस्या का उद्भवते याची संभाव्य कारणे आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे सांगत आहोत.
स्त्रियांची शारीरिक रचना अशी असते की त्यांच्या सांध्याच्या हालचाली जात होत असतात, त्यांचे अस्थिबंधन देखील फार लवचिक असतात, ज्यामुळे ते त्यांचे गुडघे पुरुषांपेक्षा जास्त हलवत असतात ज्यामुळे त्यांना पुरुषांपेक्षा गुडघेदुखी चा त्रास जास्त प्रमाणात होत असतो.
स्त्री संप्रेरक इस्ट्रोजेन गुडघे निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मासिक पाळी दरम्यान आणि रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची पातळी खूप कमी होत असते. इस्ट्रोजेनच्या पातळीत घट झाल्यामुळे गुडघ्याच्या सांध्यांना आधार देणाऱ्या कुशनिंग कार्टिलेजवर परिणाम होतो. ज्यामुळे त्यांना पुरुषांपेक्षा गुडघेदुखी चा त्रास जास्त प्रमाणात होत असतो.
स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक लवकर हाडांचे वस्तुमान गमावत असतात ज्यामुळे त्यांची हाडे कमकुवत होतात आणि सांधे खराब होण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे त्यांना पुरुषांपेक्षा गुडघेदुखी चा त्रास जास्त प्रमाणात होत असतो.
महिलांना या कारणामुळे होतो गुडघेदुखीचा त्रास
महिलांना पुरूषांच्या तुलनेत गुडघेदुखीचा त्रास जास्त का होतो याची कल्पना तुम्हाला जवळपास आलेली आहे. आता आम्ही तुम्हाला महिलांना गुडघेदुखीचा त्रास का होतो? याचे काही सामान्य कारणे सांगत आहोत.
-
महिलांना दुखापत होणे एक सर्वात मोठे कारण आहे
गुडघ्याला दुखापत झाली असेल तर त्यावर ताबडतोब उपचार करणे आवश्यक आहे. वेळेवर उपचार न केल्यास त्यांना भविष्यात वेदनांचा धोका वाढू शकतो. गुडघ्यांच्या अस्थिबंधनात ताण पडणे किंवा फुटणे यामुळे गुडघ्याचा त्रास होऊ शकतो.
-
वेदनेकडे दुर्लक्ष करणे
अनेकदा आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्रास होत असतांना देखील डॉक्टर कडे जात नाहीत आणि औषध घेत नाहीत. परंतु गुडघ्यांमध्ये सतत दुखत असेल, सूज येत असेल किंवा त्यांना वाकवताना त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. यामुळे गुडघ्यांना आणखी नुकसान होऊ शकते. परंतु आपल्यापैकी बरेच जण असे करतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढते.
-
जास्त प्रमाणात व्यायाम करने
जास्त प्रमाणात व्यायाम करने आणि धावणे यामुळे गुडघ्यांवर जास्त दबाव पडतो, ज्यामुळे त्यांचे नुकसान होण्याचा धोका वाढतो.
-
संधिवात
जरी संधिवात शरीराच्या सर्व सांध्यांवर परिणाम करत असेल तरी देखील त्याचा सर्वात जास्त परिणाम गुडघ्यांवर होतो ज्यामुळे त्यांच्या सांध्यांना सूज आणि तीव्र वेदना होऊ शकतात. ज्यामुळे त्यांना गुडघेदुखी ची समस्या उद्भवू शकते. यावर एकच उपाय आहे ते म्हणजे संधिवात झाल्यास शस्त्रक्रिया करावी.
-
पोषक तत्वांचा अभाव
आजच्या व्यस्त जीवनात आपण आपल्या आहाराकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही त्यामुळे आपल्या शरीरात अनेक आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भासत असते. शरीरात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे गुडघे दुखत असतात आणि त्यासोबतच सांधे दुखी ची समस्या सुद्धा होऊ शकते.
Orthopaedic & Robotic knee reolacement surgeon in Pune
ADVANCED BONE CARE CLINIC, WANOWRIE, PUNE
+91 8983073980
Conclusion
तर मित्रांनो आम्ही तुम्हाला या Article च्या माध्यमातून महिलांना कोण कोणत्या कारणामुळे गुडघेदुखीचा त्रास होतो त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यासोबतच पुरूषांच्या तुलनेत महिलांना घुडघेदुखी चा त्रास जास्त प्रमाणात का होतो याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास Share करायला विसरू नका.